Saturday, 2 May 2015

                         सुस्वागतम 

                           नमस्कार,
जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थी यांचे मनापासून स्वागत.  मी डॉ .शिवाजी शिंदे, आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर हा ब्लॉग घेऊन आलो आहे. खर तर जिजामाताचे विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांनाच शाळेचा व शाळेला आपला कायमच अभिमान वाटतो. मित्रांनो अजूनही ते  लहानपणीची दिवस आठवतात .....प्रत्येकाची एक आठवण असते ........एक वेगळा भूतकाळ असतो........एक संघर्षाची कहाणी असते .......ती सर करून आपण आज यशस्वी झाला आहात. कुटुंबाला, गावाला, शाळेला आपला अभिमान वाटतो . आज मागे वळून पाहताना आपल्याला आपलीच कहाणी, संघर्ष मनाला खूप उभारी देऊन जातात. 

        आपली संघर्ष गाथा आपल्याप्रमाणे आज शाळेत शिकत असलेल्या मुलांना प्रेरणादायी ठरू शकेल.  यशस्वी झालेल्या जवळच्या व आपल्याच शाळेतील मुलांची गोष्ट जास्त प्रेरक ठरते व आपुलकीची वाटते. म्हणूनच जिजामाता माजी विद्याथी संघ आपल्यासाठी एक व्यासपीठ घेऊन येत आहे .

आपल्याप्रमाणे या शाळेतील विद्यार्थी आदर्श उज्जवल भविष्य घडवतील हिच सदिच्छा 

No comments:

Post a Comment